कंपनी इतिहास

ऊस विकास उपक्रम

आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देणारे द्रष्टे नेते व देशाचे माजी कृषिमंत्री पद्मविभुषण आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी स्व. दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील (दादा) माजी आमदार यांनी तालुक्यामध्ये विकासाचा ध्यास घेवून अनेक सहकारी संस्थांची उभारणी केली. तालुक्यातील घाम गाळणारा प्रत्येक माणूस सर्व दृष्टया स्वावलंबी झाला पाहिजे यासाठी शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासाचे माध्यम निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न केले.

तहानलेल्या आंबेगाव व परिसराला सिंचन प्रकल्पामुळे पाणी मिळु लागले होते. शेतीचा विकास होवून रस्त्यांचे जाळेही निर्माण झाले होते. शेतक-यांची पिके घेण्याची पारंपारीक पध्दत बदलुन ऊसासारखी हमखास उत्पन्न मिळवून देणारी पिके घेण्याची गरज होती. आर्थिक स्थर उंचविण्यासाठी शेतक-यांनी ऊस पिकविल्यानंतर त्याच्या विक्रीसाठी जवळ आणि हक्काच्या कारखान्याची गरज ओळखून सन १९९४ साली भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उभारण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्ष उभारणीस सन १९९९ मध्ये सुरुवात करुन अवघ्या १० महिन्यात कारखान्याची उभारणी केली. नोव्हेंबर २००० मध्ये प्रत्यक्ष ऊस गाळपास सुरुवात करुन आज देशातील अग्रगण्य सहकारी साखर कारखान्यातील एक आदर्श कारखाना म्हणून कारखान्याचा नावलौकीक आहे.