सहवीजनिर्मिती प्रकल्प

ऊस विकास उपक्रम

सिझन २००६-२००७ मध्ये दि. ०४.०१.२००७ पासून ६ मे वॅट क्षमतेचा सहवीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वयीत झाला. त्यासाठी ६ मे वॅट क्षमतेचे बॅक प्रेशर कम कंन्डेन्सींग प्रकारचे त्रिवेणी मेक टर्बाईन बसविले आहे. त्यासाठी पुर्वीचेच असलेले ४५ के जी / सेमी२ ३२ मे टन क्षमतेचे वालचंदनगर मेक बॉयलर ३७ मे टन कपॅसिटी वाढवून वापरले आहे. त्यासाठी १२ एम व्ही ए ट्रान्सफॉर्मर ३३ के व्ही अे चे स्वीच यार्ड,१५०० मी३ /तास क्षमतेचा कुलिंग टॉवर व कंन्डेसर बसविले आहे.

सिझन २०१३ - २०१४ मध्ये सहवीजनिर्मिती प्रकल्पाची क्षमता १३ मे वॅटने वाढवून ती १९ मे वॅट करण्यात आलेली आहे. त्यासाठी ८० मे टन, ८७ के जी /सेमी२ क्षमतेचा थरमॅक्स मेक बॉयलर व १३ मे वॅट क्षमतेचे त्रिवेणी मेक बॅक प्रेशर टाईप टर्बाइन बसविले आहे. त्यासाठी पुर्वीचे ३३ /११ के व्ही अे चे स्वीच यार्ड काढून १३२ / ११ के व्ही अे क्षमतेचे स्वीचयार्ड व १२ एम व्ही अे चा ट्रान्सफॉर्मर काढून १८ एम व्ही अे चा ट्रान्सफॉर्मर बसविला आहे. सदरचा प्रकल्प ०४.११.२०१३ पासून कार्यान्वीत होऊन वीज निर्यात चालू झालेली आहे.

सहवीजनिर्मिती प्रकल्पासाठी खालील प्रमाणे ऑक्झीलरी उपकरणे वापरली आहे.
१. ६ मे वॅट प्रकल्पासाठी भेल मेक जनरेटर, ४१ टन/तास क्षमतेचे कंडेनसर,१५०० मी३/ तास क्षमतेचे कुलिंग टॉवर वापरलेले आहेत.
२. १३ मे वॅट प्रकल्पासाठी टि डी पी एस मेक जनरेटर, ३००मी३ क्षमतेचा कुलिंग टॅावर३०मी३/तास क्षमतेचा डी एम प्लॅट, बॉयलर व टर्बाइन कंट्रोलसाठी जी ई मेक डीसी एस सिस्टीम, झिरो पोलूशन साठी ई एस पी बसविलेला आहे.