संगणक विभाग

ऊस विकास उपक्रम

संगणक प्रणाली :-

  1. सुरुवातीपासूनच संगणक प्रणालीचा अवलंब करणेत आलेला असून नवीन प्रोग्राम हा C# DOT NET या टेक्नॉलॉजीने विकसित केला आहे.
  2. मटेरियल खरेदी आणि विक्रीचे व्यवहार ई-टेंडरींगद्वारे ऑनलाईन पध्दतीने करण्यात येतात.
  3. शेतक-यांना त्यांचे गाळपास आलेल्या ऊसाचे वजनाची माहिती दैनंदिन एस.एम.एस. द्वारे पाठविली जाते.
  4. तसेच पंधरवडा बिलाची माहिती ऊस उत्पादक शेतक-¬याला एस.एम.एस.द्वारे बिलाची रक्कम जमा होणेपुर्वी एक दिवस अगोदर पाठविली जाते.

स्मार्ट केन मॅनेजमेंट सिस्टीम :-

  1. गाळप हंगाम 2018-19 पासुन आपले कारखान्यातील शेतकी विभागातील कामकाजाकरिता अत्याधुनिक संगणकीय तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट केन मॅनेजमेंट सिस्टीम विकसित करून त्याचा अवलंब करत आहे.
  2. त्यामध्ये ऊस नोंदणीपासुन ते वजनकाट्यापर्यंतची सर्व कामे जसे ऊस क्षेत्र नोंद, फ़िल्ड स्लिप, नंबर टेकर, ऊस वजन पावती इत्यादी अचुकरित्या डेटाबेसमध्ये फ़ीड करणेसाठी प्रगत व अत्याधुनिक स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वापर स्मार्ट केन मॅनेजमेंट सिस्टीममध्ये करण्यात आला आहे.
  3. सदर सिस्टीममध्ये शेतकी गट ऑफ़िस रूट प्लॅनिंग, ऊस विकास, ऊस तोडणी, ऊस तोडणी कॉन्ट्रॅक्टर व संबधित माहिती व ऊस वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनांकरता अद्यावत स्वयंचलित नंबर टेकिंग सिस्टिम इत्यादी गोष्टी अंतर्भुत करण्यात आलेल्या आहेत. गट ऑफ़िसचे तसेच कारखाना स्थळावरील केनयार्ड विभागाचे कामकाज पेपरलेस करण्यात कारखाना प्रशासनास यश आले आहे.
  4. अद्यावत स्वयंचलित तंत्रज्ञानामुळे कमी कालावधीत अचुक व पारदर्शक कामकाज चालवण्यास मदत झाली आहे.
  5. भविष्याच्या दृष्टीने कारखान्यास अत्याधुनिक स्वयंचलित तंत्रज्ञानयुक्त स्मार्ट केन मॅनेजमेंट सिस्टीम फ़ायदेशिर आहे.