सामान्य माहिती

ऊस विकास उपक्रम
  • कारखाना उभारणी :- 
  • नोंदणी - दि. ३१/०३/१९९४
  • कारखाना भूमीपूजन - दि. १८/०६/१९९९

कारखाना भूमीपूजन शुभहस्ते- मा.सौ. प्रतिभाताई पवार

  • मा.आ.श्री. अजितदादा पवार
  • प्रथम गळीत हंगाम शुभारंभ - दि. १४/११/२०००

प्रथम गळीत हंगाम शुभारंभ शुभहस्ते - मा.ना.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब

मा.सौ. प्रतिभाताई पवार

कै. गोपीनाथ मुंडे

मा.श्री. रामदास आठवले

  • फक्त १० महिन्यात उभारणी झालेला एकमेव कारखाना.
  • आजपर्यंत यशस्वीरित्या गळीत हंगाम पार पाडले.
  • मध्य रिकव्हरी विभागात सतत एफ.आर.पी. पेक्षाही जास्तीत जास्त ऊस दर दिलेला आहे.
  • संपुर्ण संगणक प्रणालीचा वापर करुन कमी मनुष्यबळामध्ये अचूकता मिळविलेली आहे. 
  • बायोमॅट्रीक हजेरी सिस्टींम व सी.सी.टिव्ही. कॅमे-यांचा वापर करुन चुकीच्या बाबींना आळा घातला आहे.
  • पेट्रोल व डिझेल पंपाची उभारणी करुन शुध्द पेट्रोल व डिझेलचा पुरवठा केला आहे.
  • ना नफा ना तोटा तत्वावर कृषि सेवा केंद्राची उभारणी करुन औषधे व खतांचा पुरवठा केला आहे.
  • जलशुध्दीकरण प्रकल्पाची (R.O.) उभारणी करुन सभासद, ऊस उत्पादक, कामगार, ऊस तोडणी कामगार यांना अल्प दरामध्ये शुध्द पाण्याचा पुरवठा केला आहे.
  • साखर कारखानदारीमध्ये ऊस तोडणी कामगारांसाठी प्रथमच कोपीतळावर सुलभ शौचालयाची सुविधा उपलब्ध केलेली आहे.

साखर प्रक्रियेदरम्यान तयार होणा-या वाफेच्या पाण्याचा वापर करुन नदीवरील पाणी वापर कमी केलेला आहे.

  • सहवीज निर्मिती प्रकल्प :- फक्त साखर उत्पादन करुन शेतक-यांना योग्य भाव देवू शकत नाही. तसेच आजच्या स्पर्धेच्या युगात टिकू शकत नाही. याकरीता उपपदार्थ निर्मिती करणे आवश्यक झाले आहे. याबाबीचा विचार करुन सहवीज प्रकल्पाची खालीलप्रमाणे उभारणी केलेली आहे.
  • ६ मे.वॅट सहवीज निर्मीती प्रकल्प उभारणी :- दि. ०४/०१/२००७
  • १३ मे.वॅट वीज निर्मिती प्रकल्प उभारणी. :- दि. ०४/११/२०१३

१३ मे.वॅट प्रकल्प उद्‌घाटन शुभहस्ते: मा.ना.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब,कै. वसंतराव डावखरे

रोजगार निर्मिती :- कारखाना कामगार, ऊस तोडणी कंत्राटी कामगार, ऊस वाहतुक कंत्राटी कामगार, हमाली काम, बगॅस बेलींग, गव्हाण काम, साफसफाई इ. कामाद्वारे हजारो कामगारांना प्रत्यक्ष रोजगार व वरील कामगार कारखाना परिसरात वास्तव्यास आल्यामुळे किराणा, हॉटेल, टायर पंक्चर, वेल्डींग, गॅरेज, भाजीपाला, चिकन सेंटर, सलून, कापड, चप्पल, आठवडा बाजार, खते औषधे, ठिबक सिंचन इ. व्यवसायांची भरभराट होवून हजारो बेरोजगारांना व्यवसाय रुपाने अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झालेला आहे.

  • नियोजित प्रकल्प :- 
  • ६००० टीसीडी विस्तारीकरण :- ६००० टीसीडी विस्तारीकरणासाठी केंद्र शासनाचे आय.ई.एम. मिळाले असून विस्तारीकरणाच्या दृष्टीने सर्व मंजूरी व पुर्तता केलेल्या असून गळीत हंगाम २०१९-२० संपल्यानंतर विस्तारीकरणास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. 
  • ४५ केएलपीडी डिस्टलरी उभारणी :- ४५ केएलपीडी डिस्टलरी उभारणीस केंद्र शासनाचे आय.ई.एम. मिळाले असून एन्व्हॉयरमेंटल क्लिअरन्स घेणेची कार्यवाही चालू आहे. डिस्टलरी उभारणी करणेच्या दृष्टीने सर्व मंजूरी व पुर्तता प्राप्त होताच प्रत्यक्ष उभारणीस सुरुवात करणार आहे