VSI आणि CSRC Padegaon पासून सुधारित ऊस बियाणे वाण पुरवठा देखील शेतक-यांना वाजवी दर शेतीसाठी लागणारे साहित्य म्हणजे रासायनिक खते, कीटकनाशके कीटकनाशक पुरवठा.
तसेच माती आणि पाणी परीक्षण प्रयोगशाळा सुसज्ज.
भांडार विभागाचे कामकाज पुर्णपणे संगणकावर केले जाते त्यामुळे सदरील प्रणालीच्या वापरामुळे पढीलप्रमाणे फायदे झालेले आहेत.
1) तांत्रिक क्षमता : प्रतिदिन 2500 मे. टन गाळप क्षमता असलेल्या कारखान्याच्या दृष्टीकोनातून भाडार विभागाचे कामकाज आयटम मास्टर, रिक्विझीशन, पर्चेस ऑर्डर, गुडस् रिसीट नोट, इन्सपेक्शन , बिल इन्ट्री, क्रेडीट नोट, लोन रजिष्टर, जनरल रिपोर्ट, टॅक्सेस इ. संगणकावर केले असता त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही तसेच प्रत्यक्षात मटेरियल व्यवस्थित ठेवणेपासून संबंधीत विभागाच्या मागणी नुसार उपलब्ध करुन देईपर्यंत कसलाही अडथळा निर्माण होत नाही म्हणजेच पूर्ण क्षमतेने काम करता येते.
2) उत्पादकता व गणवत्ता : संगणकावरील माहीतीमुळे संबंधीत विभागास उदा. केमीकल, धानूडॉल पावडर, लाईम, सल्फर, आर्थोफॉस्फरिक ॲसिड, इ. मटेरियल भांडार विभागाकडे किती तारखेल आलेले आहे व त्याची वापराची अंतिम मुदत किती आहे याची माहीती त्यांना भांडार विभागाकडे चौकशी न करता कोणत्याही क्षणाला / वेळेला पाहण्याची उपलब्धता झालेली असते. त्यामुळे जुने मटेरियल प्रथमत: वापरात येते. म्हणजेच ज्या क्रमाने मटेरियल आले त्याच क्रमाने मटेरियलचे वाटप होते. त्याच प्रमाणे पाठीमागील तीन ते पाच वर्षापर्यंत त्या मटेरियलचे खर्चाचे प्रमाण व त्यापासून झालेले जास्तीत जास्त फायदे, आलेख / तुलनात्क पध्दतीने एकाच दृष्टीक्षेपात पाहता येत असल्यामुळे कोणते मटेरियल मागणी करावयाची व ते वापरावयाचे याचा अचूक निर्णय घेता येतो त्यामुळे उत्पादकता व गुणवत्ता उत्कृष्ट प्रकारे राहण्यास मदत होते.
3) सामान्य प्रक्षासन : संगणक प्रणालीच्या कामकाजामुळे कमीत कमी कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त कार्यक्षमतेने काम करुन घेता येते. प्रशासनाला आवश्यक माहीतीची गरज असल्यास अशी माहीती त्वरीत काढून देता येते. सहाजिकच कमी वेळेत त्यासंबंधीत निर्णय त्वरीत घेता येणे शक्य होत असल्यामुळे त्याचा फायदा अर्थातच कारखान्याला होतो.
4) आर्थिक व्यवस्थापन : संगणक प्रणालीमूळे कणत्याही वेळेस आपल्याला आवश्यक असणाऱ्या मटेरियलचा स्टॉक व त्याची किंमत घेता येते म्हणजेच भांडार विभागाकडे गरजेपुरताच माल शिल्लक राहतो. अवाजवी स्टॉक शिल्लक न राहिल्यामुळे स्टोअर व्हॅल्यूयेशन किमान मर्यादेपर्यंत राखता येते. त्यामुळे कारखाना आर्थिकतेच्या बाबतीत तोशिस लागत नाही. थोडक्यात गरजेच्याच मटेरियलची खरेदी व त्याचा वापर याबाबतीत योग्य सांगड घालता येऊन त्याचप्रमाणे आर्थिक व्यवस्थापन करता येते.
5) कृषी व्यवस्थापन : ऊस लागवड, तोडणी वाहतुकीकरिता लागणाऱ्या मटेरियल संदर्भात उदा. कोयते, वायररोप, टायरगाडी व शेतकीशी निगडीत असणारे साहीत्य व खते याबाबतची सत्य व अचूक माहीती देणे शक्य असल्यामूळे त्याचा फायदा कृषी विभागास व्यवस्थापन करताना होतो.
6) पर्यावरण व्यवस्थापण : भांडार विभागाची रचना दूरदृष्टी ठेऊन केल्यामूळे यार्डच्याबाजूने नारळ, चिकू, फणस, जांभळ, गुलमोहोर, लिंब, इ. वृक्षाची व फळबागांची लागवड केलेली आहे. व त्याच्याच छायेखाली शेडबांधणी करुन ऑईल, केमिकल इं. सारखे मटेरियल ठेवलेलमुळे ऊन, वारा, धूळ, इ. बाबींपासून संरक्षण होऊन मटेरियलच्या सुरक्षेत वाढ होते.
7) इतर : संगणक प्रणालीमुळे भांडार कामकाजामध्ये पारर्शकता राहते तसेच संबंधीत कोणतीही माहीत काढावयाची असल्यास वेळेची बचत होते. कमीत कमी कालावधीत माहीती पाहता येते त्यामुळे अचूक निर्णय घेणेस मदत होते. रेकॉर्ड ठेवणे करीता कमी जागा लागते. रजिष्टरची गरज राहत नाही. अशा सर्वच बाबतीत त्याचे फायदे होतात.